तंटामुक्ती समिती अध्यक्षांवर चाकूने केला प्राणघातक हल्ला

0
285

 

चंद्रपूर

महातारदेवी गावाचे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुरेंद्र झाडे वय 31 वर्ष यांच्यावर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस पूर्ववैमनस्यातून विनोद राजूरकर वय 45 वर्ष यांने चाकूने हल्ला केला.
सुरेंद्र झाडे हे घराशेजारीच मित्रा सोबत बोलत असतांना अचानकपणे झालेल्या हल्ल्यात झाडे यांच्या गळ्यावर चाकु लागला असता त्यांना वाचविण्यासाठी अविनाश भोंगळे हे गेले असता आरोपीने त्यांच्यावर ही चाकूने हल्ला चढविला यात ते ही जखमी झाले
यामुळे गावात दहशत पसरली जखमींना घुग्घुस येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून आरोपींला घुग्घुस पोलिसांनी तात्काळ अटक करून 307 भांदवी नुसार गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पो.नि. विरसेन चहांदे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here