रेती तस्करी : अधिकाऱ्यांशी संगनमत करून रेती तस्कर “चोरावर मोर”

0
216

चंद्रपूर

दर आठ दिवसात ट्रॅक्टरने रेती तस्करी करणाऱ्या छोट्या तस्करांवर कधी पोलीस ते महसूल विभागा तर्फे कारवाई करण्यात येते.
यामध्ये नायब तहसीलदार, पटवारी यांचा समावेश असतो यांच्या मार्फत या ट्रॅक्टर मालकांवर दंड ही ठोकण्यात येतो
व कधी पोलीस कारवाई केल्या जातो.
या ट्रॅक्टर तस्करांतर्फे घाटातून रेती आणून परिसरात साठा करण्यात येतो व नंतर प्रति ट्रॅक्टर चार ते पांच हजार रुपयाला ट्रॅक्टर व हायवाने विकल्या जातो.
मात्र अधिकाऱ्यांशी संगनमत करून मोठे तस्कर या चोरावर मोर होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.
साठविलेल्या रेती साठेची माहिती तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी दिली जाते व त्यांच्या माध्यमातून या रेती साठ्यावर धाड टाकून साठा जप्त करून परत त्यांचा लिलाव मर्जीतल्या तस्कराला केल्या जातो व या रेती साठ्या सह हजारो ब्रास रेती रॉयल्टी दाखवून उचल केल्या जाते व त्यांची महागड्या दरात जिल्ह्याभरात विक्री केल्या जाते.
यामध्ये सर्वांचा वाटा असतो.
दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मायनींग विभागातर्फे चार ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली व आठ दिवसांपूर्वी घुग्घुस पोलिसांनी दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली होती.
ही थातुरमातुर कारवाई नेहमीच बाब झालेली आहे.
मात्र यातून मोठे तस्कर सदैव सुरक्षित असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here