एटीएममधून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास भरावे लागेल अतिरिक्त शुल्क ?

0
345

एटीएममधून ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास येत्या काही दिवसांत त्यावर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. सध्याच्या पाच मोफत व्यवहारांमध्ये हा नवा नियम समाविष्ट असणार नाही. एटीएम शुल्काच्या समिक्षेबाबत जून महिन्यांत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक समिती नेमली होती, आपल्या शिफारशी या समितीने बँकेकडे सोपवल्या आहेत.

एकाच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढल्यास २४ रुपये अतिरिक्त शुल्क ग्राहकाला द्यावे लागू शकते. सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर जर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर त्यावर ग्राहकाला २० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here