“बापरेबाप” 16 लक्ष 75 हजार चा विदेशी दारू सह मुद्देमाल जप्त

497

 

मुन्ना खेडकर
बल्लारपुर

नवीन आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सर्व पोलीस ठाण्यात आदेश दिला आहे जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारी, अवैध व्यसाय,अवैध दारू तस्करी यांचा वर लगाम लावण्या करिता धरपकड मोहीम राबविण्यात येत आहे.

यातच बल्लारपुर पोलिस चा( DB)गुन्हे शाखेने आढवडा चा आतच दुसरी मोठी कारवाई केली.आज दी,18 रोजी मुखबिर चा खबरी वरून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व टीम ला खात्रीपूर्वक माहिती मिळाली की तेलंगाणा राज्यातून एका ट्रक मधून दारू ची खेप शहरात दाखल होत आहे अशी माहिती मिळताच सा पो नि विकास गायकवाड आपल्या चमू ला घेऊन बामणी टी पॉईंट पासून गुरुनानक कॉलेज पर्यंत घात लावून होते सकाळ च्या दरम्यान खबऱ्या चा माहिती वरून एक ट्रक येतांना दिसले ट्रक ला शहरात दाखल होण्या आधीच बामणी गावा जवळील बालाजी हायस्कूल समोरच वाहन ला थांबविण्यात आले वाहन थांबताच वाहनातील चालक व आरोपी मोका पाहून फरार झालेवाहनाची झडती घेतली असता त्यात 40 खरड्याचे बॉक्स मध्ये ऑफीसर चॉईस(oc)दारू आढळून आली विदेशी दारू ची अंदाजे की,11लाख52हजार रु, व अशोक लेलेंड ट्रक ची अंदाजे की,20लाख रु, असे 31लाख52हजार रु, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही अवैध दारू ची खेप आरोपी श्रीकांत बोद्दल रा, आंबेडकर वॉर्ड वाहन चालक व मालक रा, बल्लारपुर यांचावर अप क्र,670/2020 मदाका 65(ई)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर ही चार दिवस पहले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खबऱ्या चा माहिती वरून एका पिकअप गाडीत 85 पेटी देशी दारू सह 16 लाख 75 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचा आदेशानुसार पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे API विकास गायकवाड, अजय हेडाऊ, शरद कुडे, सुनील कांबळे, सुधाकर वरघणे व टीम ने केली, फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.