आ.मुनगंटीवार यांच्या हाकेला,ग्रामस्थांची साद….. उथळपेठ होणार आदर्श ग्रामपंचायत

0
157
उथळपेठवासीयांनी आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेवर विश्वास ठेवून दोन वेळा १००% मतदान केले.परिणामी या गावाचा सर्वांगीण विकास करून उथळपेठ ग्रामपंचायत देशात सर्वात सुंदर करण्याचा संकल्प आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केला आहे.ग्रामस्थांच्या सहकार्यानेच हे लक्ष गाठता येईल,असे प्रतिपादन भाजपा नेते प्रकाश धारणे यांनी केले.याला ग्रामस्थानीं टाळ्यांच्या गजरात समर्थन दिल्याने,आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हाकेला उथळपेठवासीयांनीं साद दिल्याची चर्चा होऊ लागली आहे.प्रकाश धारणे,नवरात्री उत्सवाच्या शुभमुहूर्तावर उथळपेठ येथे शनिवार(१७ऑक्टोबर)ला स्वयंचलित सॅनेटायझर मशिनचे लोकार्पण प्रसंगी बोलत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून सरपंच पलिंद्र सातपुते,मनपा नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,जेष्ठ नागरिक वासुदेव चिचघरे,पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची मंचावर उपस्थिती होती.
धारणे म्हणाले,जे गाव,तत्परतेने विकासाच्या बळावर १००%भाजपा ला मतदान करेल, त्या गावाचा तितक्याच तत्परतेने  १०० % विकास करण्याचे आश्वासन आ मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिले होते.या कसोटीत उथळपेठ हे गाव खरे उतरले आहे.म्हणून आता या गावाला देशातील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचात करण्याचा संकल्प आ.मुनगंटीवार यांनी केला आहे.  ग्रामस्थांनी त्या दृष्टीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.याच वेळी त्यांनी ग्रामस्थांच्या एकतेचे कौतुक केले.
यावेळी बोलतांना सुभाष कासंगोट्टूवार म्हणाले,आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या  दूरदृष्टीची पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनीही प्रशंसा केली आहे.त्यांचे कार्य हाच त्यांचा परिचय आहे.सत्तेत असतांना अहोरात्र एक करून त्यांनी गावचं नाही तर राज्याच्या विकासासाठी कार्य केले.सत्ता नसली तरी ते दिलेला शब्द पळतात,याचे अनेक उदाहरण आहेत.कोरोना संकटात त्यांचे भरीव मदतकार्य,त्यांच्यातील संवेदनशील लोकप्रतिनिधीची व मानवतेची पावती होय, असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच सातपुते यांनी,गावाच्या विकासासाठी आ.मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांची माहितीची उजळणी केली.सिमेंट रोड, बंदिस्त नाल्या,व्यायाम शाळा,सभागृह,डिजीटल शाळा,आय आय.एस.ओ. दर्जाप्राप्त अंगणवाडी,जलशुद्धीकरण केंद्र,निसर्ग पर्यटन गोमुख,प्रत्येक घरी सोलर लाईट आदींचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.उथळपेठवासी सदैव सुधीरभाऊंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी जाहीर केले.आ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून श्री माता कन्यका सेवा द्वारा प्रायोजित स्वयंचलित सॅनेटायझर मशिनचे लोकार्पण जेष्ठ नागरिक वासुदेव चीचघरे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन,प्रास्ताविक व आभार व्यक्त प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.
कार्यक्रमाला बच्चे कंपनींसह निरंजन सातपुते, प्रभाकर चिचघरे ,संतोष येरमुलवार ,विठ्ठल वाढई, सुधाकर चिचघरे, श्रीकृष्ण बुरांडे,जितेंद्र सातपुते,अनिकेत सातपुते आदी ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here