राज्यमंत्री बच्चू कडू यांना सारती असोसिएशन चे निवेदन

253

चंद्रपूर

आर्थिक तंगीला कंटाळून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी श्री.विलास गुरनुले यांनी नुकतीच आत्महत्या केली संस्थाचालक मालक बनले असून ते भ्रष्टाचार करीत आहे कर्मचार्याचे वर्ष भर पगार करीत नाही व माघील काही वर्ष्यापासून भविष्य निर्वाह निधी ची रक्कम सुधा भरलेली नाही व कर्मचार्यांचे आर्थिक शोषण करतात संस्थाचालक तुपासी व कर्मचारी उपासी ह्या संस्थाचालकाच्या नीती व मनमानी भोंगड कारभारामुळे कर्मचार्याची अवस्था डबघाइस आलेली आहे वरिष्ठ स्तरावर तक्रारी करून सुधा काहीच कार्यवाही होत नाही प्राचार्याला हाताशी धरून अध्यक्ष व प्राचार्य लुट व शोषण करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी,बल्लारपूर येथील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन, राजीव गांधी अभियांत्रिकी, श्री. साई अभियांत्रिकी, श्री. साई तंत्रनिकेतन व इतरही काही महाविध्यालायाच्या कर्मचार्याचे पगार १२ महिन्यापासून झाले नाही सारती असोसिएशन,महाराष्ट्र राज्य ह्या महाराष्ट्रातील पिडीत कर्मचार्याच्या बाजूने लढा उभारून कर्मचारी बचाव धोरण आखले आहे सारती असोसिएशन,महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री. देवेंद्र सायसे व त्यांचे शिष्टमंडळ श्री. कमलेश माडुरवार ,श्री.प्रमोद बोकडे,श्री.राहुल भोयर,सौ.तरनून पठाण,सौ.शुनकला वानखेडे, सौ. रुपाली शिगजुडे,श्री. मिथुन रोहणकर, श्री.रीनकेश देव्हारे यांनी नुकतेच राज्यमंत्री ना. बच्चू भाऊ कडू यांना नागपूर येथे भेटून महाराष्ट्रातील विनानुदानित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन च्या थकीत पगाराबाबत व थकीत भविष्य निर्वाह निधी व अन्य विषयावर चर्चा केली व निवेदन दिले त्यांनी हा गंभीर प्रश्न मंत्रिमंडळात ठेऊन सोडवण्याचा तोंडी हमी दिली.