सी. सी. आय. कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा !

0
182

 चंद्रपूर

      शेतकऱ्यांना परतीच्या पावसा ची झळ पोहचत असल्यामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील तिन्ही कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या असून या बाबत चर्चा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांची भेट घेतली. यावेळी सदर मागणीचे निवदेनही देण्यात आले.

   परतीच्या पावसाने जिल्ह्यातील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस उत्पादक  शेतक-यांनी कापसाची पहिली वेचणी केली परंतु सी. सी. आय. कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस कुठे विकायचा कसा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. चंद्रपूरातील शेतकरी मोठया प्रमाणात कापसाचे पिक घेत असतो. यंदा अनियमीत पावसामूळे कापूस उत्पादक शेतकर्याना हवे तसे उत्पादन मिळालेले नाही. त्यातच आता परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठे नूकसाण केले आहे. कापूस बोंडाला आल्याने अनेकांची कापसाची वेचनी करुन ठेवली आहे. मात्र सिसिआय केंद्र बंद असल्याने तो विकायचा कुठे या संभ्रमात शेतकरी सापडला आहे. त्यातच आता परतीच्या पावसाने वेचलेला कापूसही ओला झाल्याचे प्रकार समोर येत आहे. हि बाब लक्षात घेता बंद करण्यात आलेले सर्व सिसिआय केंद्र सुरु करण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. याबाबत आ. जोरगेवार यांच्या एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांची भेट घेतली असून सदर मागणी बाबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांना सिसिआय केंद्र सुरु करण्यात यावे या मागणीचे निवेदनही देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे गणपत कूडे, नंदकिशोर वासाडे, प्रभाकर धांडे, जंगलू पाचभाई, राकेश पिंपळकर, अरुन तुराणकर, मुन्ना जोगी आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here