20 रुपया साठी गेली एसटीच्या वाहकाची नोकरी

0
881

ब्रह्मपुरी –

एका प्रवाश्यांला तिकीट न देता त्यांचेकडून 20 रुपये प्रवासभाडे वसूल केल्याने वाहक आर.वी. आलाम यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागाने बडतर्फ केले.
9 मार्चला ब्रह्मपुरी आगाराची बस क्रमांक mh40 aq 6198 मोहाडी ते सिंदेवाही मार्गावर प्रवास करीत असता त्यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करीत होते.
त्यापैकी मोहाडी ते सिंदेवाही असा प्रवास करणारा एक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले होते, वाहक आलाम यांनी प्रवाश्यांकडून प्रवासभाडे 20 रुपये वसूल केले मात्र तिकीट दिली नाही.
त्या प्रवासादरम्यान बस ची तपासणी केली असता वाहकाजवळील रोकड तपासली असता तिकीट विक्रीच्या हिसोबपेक्षा बरोबर आढळली होती.
ही बाब गडचिरोली विभागातील अधिकाऱ्यांना खटकली व त्यांनी फक्त 20 रूपयासाठी वाहकाला नोकरीतून चक्क बडतर्फच केले, ही बाब मात्र न पटणारी आहे.
सदर प्रकरणात आरोपपत्र आलाम यांच्या विरोधात सिद्ध झाल्याने एसटी महामंडळ गडचिरोली विभागाने आलाम यांना कारण बजाव नोटीस जारी केले मात्र वाहक आलाम यांनी त्या पत्राचे उत्तर दिले नाही.
म्हणून आलाम यांना 13 ऑक्टोम्बर 2020 ला महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here