तपोवन एक्सप्रेस कडून गरजु कुटुंबाला मदत

0
165

वरोरा

तालुक्यातील ऐंसा कोंढाळा मार्गावर जंगलात वसलेल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या 20/25घरे असलेल्या छोट्याश्या लोकवस्तीत कारू गंगाराम पवार या शेतकऱ्याच्या घराला सोमवार ला दु. 2च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणी नेमक्या त्याच जळून खाक झाल्यावर माणूस आत्महत्या करण्या पलीकडे दुसरा कोणताही विचार करणार नाही. अशा इकडे आड तिकडं विहीर अशा परिस्थितीत पीडित कुटुंबातील लोकांना अन्न, वस्त्र, आणी निवारा बाबतीत शासकीय मदतीची वाट न पाहता, तपोवन एक्सप्रेस या व्हाट्स अप ग्रुप वर डॉ. मनोज तेलंग या सामाजिक कार्यकर्ता यांनी पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी आवाहन करताच, गहू, तांदूळ, तेल, तिखट, साबण, भाजीपाला, साखर अशा जीवनावश्यक वस्तू करीता कुणी साहित्य रूपाने तर कुणी रोखीने मदत करण्यासाठी पुढे आले, आणी ही मदत पीडित कुटुंबाला घरपोच नेऊन देण्यात आली. अजूनही त्या पीडित कुटुंबाला सावरण्या करीता मदत करण्यासाठी उमेश देशमुख, श्याम तडसे, सचिन येरणे, धीरज लाकडे, अमर गोंडाणे, राहुल तेलंग यांची धडपड सुरु आहे. परिसरात त्यांनी केलेल्या कार्याची प्रशन्स होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here