ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास मुख्याध्यापकांवर होणार कडक कारवाई

296

चंद्रपूर :  कोरोनाच्या उद्रेकाने पालकांचे कंबरडे मोडले असतांना तश्यातच ऑनलाईन फी भरण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचा तगादा या सर्व घडामोडींवर शिक्षण विभागाचे उपसंचालक यांच्या पत्राने पालकवर्गाना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या शाळा पूर्णपणे बंद असल्याने शाळा व्यवस्थापकांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला, मात्र ह्या ऑनलाइन शिक्षण काळात शाळा व्यवस्थापनाने शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणच बंद केले.

शैक्षणिक हित विचारात घेतले तर शाळेची ही कृती समर्थनीय मुळीच नाही, चंद्रपुरात असे अनेक प्रकार घडलेले आहे.
शिक्षण उपसंचालक यांनी नागपूर विभागातील चंद्रपूर, भंडारा , गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे आदेश दिला आहे की शैक्षणिक शुल्क न भरल्याने ज्या शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंक उपलब्ध केली नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
हा आदेश संबंधित जिल्ह्यातील विना अनुदानित, सीबीएससी व इतर शाळांना लागू राहणार.
जर ऑनलाईन शिक्षण सुरू असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे कारण विद्यार्थ्यांना सांगणे बंधनकारक असणार आहे.
या आदेशाने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.