सीमा लगत राज्यातून होणाऱ्या दारू तष्करीत समोर आले पंचायत समिती सदस्य श्रीनिवास कंदनूरीवार नाव ?

0
233

चंद्रपूर : सीमा लगत तेलंगणा राज्यातून दारू तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाला मिळताच रात्रीच्या सुमारास सापळा रचून दारू तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करीत एलसीबी पथकाने दोन लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटना ही सोमवारच्या रात्रीची तीन वाजता दरम्यान घडली.

जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्याला शेजारच्या तेलंगाना राज्यातून प्रचंड प्रमाणात दारूसाठा पुरवठा करण्यात येतो. स्थानिक पोलिसांची मूकसंमती च्या आधारावर राज्य पणे सुरु असलेल्या या अवैद्य दारू तस्करी व्यवसायाला काल दुसऱ्यांना ब्रेक लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरला यश आले असून काल तेलंगणा राज्यात तून नंदवर्धन – अडेगावं मार्गावर दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथक चंद्रपूर ने सापळा रचून समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला थांबून चौकशी केली असता एकूण दोन लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीस बेड्या ठोकल्या. तद्वतच या तक्रारी बाबत अधिकची चौकशी केली असता अटकेत घेतलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता माजी पंचायत समिती सदस्य श्रीनिवास कंदनूरीवार यांचे प्रमुख नाव समोर आले असून राजकारणी लोकांनी सुद्धा आता अवैध दारू व्यवसायात पाय ठेवल्याचे दिसून येत आहे., ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तुळशीराम पोटे रा. भं.तळोधी, दुर्योधन बडगे रा.सुपगाव, तर सदर घटनेतील नरू उर्फ दाणा पोटे रा.मक्ता, संदीप बडगे, कालिदास आऊटकर रा. सुपगाव हे फरार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. उपरोक्त कारवाई एलसीबी चे धनंजय करकाडे, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितेश महात्मे, प्रशांत नागोसे यांनी पार पाडली. गेल्या काही महिन्यांपूर्वी एलसीबी शाखा चंद्रपूर च्या वतीने अशीच एक मोठी कारवाई भंगाराम तळोधी परिसरातच करण्यात आली होती तर काल रात्री जेसीबीने चालविलेल्या दुसऱ्या कारवाईमुळे अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून काही महिन्यांच्या कालावधीतच एलसीबी ने सलग दोन मोठ्या कारवाया पार पडल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here