रेती तस्करी विरोधात अभिनव आंदोलन, सत्तर फुटाच्या टॉवर चढून आंदोलनाची सुरुवात

0
221

 

वरोरा, प्रति

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून मागील काही दिवसापूर्वी वर्धा नदीतून रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी पडून मरण पावला होता, पण यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, उलट पुन्हा रेती चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदने देवून अवैध रेती चोरीवर आळा घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला होता पण तरीही महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नाही,

त्यामुळे गुरूवारी सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास मनसे तालुकाध्यक्ष तहसील कार्यालयातील सत्तर फुटाच्या टॉवर चढून आंदोलनाची सुरुवात केली आहे.

शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असून सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी ७०००रू ट्रॅक्टर भावाने रेती विकत घ्यावी लागत आहे, या अवैध व्यवसायात प्रशासनही लिफ्त असून त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते आहे.
जोपर्यंत जिल्हाधिकारी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
वरोरा शहरातील जनता या अभिनव आंदोलन करणाऱ्या व्यक्तीस पाहण्यासाठी जमा झाले मात्र अजूनपर्यंत प्रशासन सुस्त अवस्थेत पडून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here