वर्धा – पैनगंगा नदीच्या संगम घाटावर अवैध रेती उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

0
172

घुग्घूस : 

वर्धा पैनगंगा नदीचा संगम असलेल्या वढा रेती घाटावर धाड टाकून रेतीचे अवैध उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर उत्खनन अधिकारी अल्का खेडकर, बि.वाय. वरखडे यांच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या ट्रॅक्टरकडून एकूण २ लाख २१ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. जप्त केलेले ट्रॅक्टर पांढरकवडा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले आहे. वढा रेती घाटावरून मागील काही दिवसापासून रेती तस्करी सुरू आहे. आतापर्यंत हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने लाखो रुपयांचा महसुल बुडाला आहे. महसुल विभागाच्या या कारवाईन रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here