“त्याच्या” हिंमतीला सलाम…..

0
268

यवतमाळ

रोजगार संघाचे अध्यक्ष प्रा संजय नाथे यांची प्रेरणा,कार्याध्यक्ष गजाननराव बोबडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य यातुन अंकित तिखे या तरुणाने गतवर्षी यवतमाळ येथे 250 विद्यार्थी बसेल अशा क्षमतेची सर्व सोई सुविधांनी युक्त वातानूकुलीत अभ्यसिका सुरु केली.जवळ एक कपर्दिकही नसतांना बाजारातून भांडवल उपलब्ध करून त्याने हे धाडस केले.500 रुपये प्रतिमाह फी आकारुन विद्यार्थ्यांना अभ्यसिका उपलब्द झाली..विद्यार्थी संख्या वाढत गेली..आणि करोना आला. या करोना काळात सर्व व्यवहार ठप्प..केलेली प्रचंड गुंतवणुक,घेतलेली मेहनत ,देणे असलेली देणी याच प्रचंड टेंशन डोक्यावर घेऊन तो मार्ग शोधू लागला..पण हरला नाही..सर्वांना घेऊन चालणारा स्वभाव,बोलण्यातील गोडवा,मेहनत करण्याची क्षमता या बळावर त्याने उत्पन्नाचे काही नवीन मार्ग शोधले..आणि तो याही काळात जिद्दीन उभा राहिला…रोजगार संघाच्या आम्हा हीतचिंतकांना लॉक डाऊन काळात वाटले की आता याच काय होणार..?जेंव्हा त्याच्या मानवता अभ्यसिकेचे उदघाटन प्रसंगी शिक्षण महर्षी डॉ नंदुरकर सर, प्रा.संजय नाथे ,गजाननराव बोबडे आणि मी स्वता हजर होतो तेंव्हा त्याच्यातील आत्मविश्वास आम्ही बघीतला.त्याआधी अंकित म्हणजे बिघडलेल पोर अशीच आमची धारणा झालेली..मात्र आज अभ्यसिकेच्या माद्यमातून त्याची घडण बघत होतो.. असे तरुण तेजस्वीपणे उभे राहावे हाच ध्यास घेऊन रोजगार संघ नाथे सरांचे मार्गदर्शनात कार्य करीत असतो..आज यवतमाळ येथे प्रत्यक्ष त्याच्या अभ्यासिकेला भेट दिली…आणि मनातल्या सर्व शंका,कुश्ंका दुर झाल्या..135 विध्यर्थी आज अभ्यसिकेचा लाभ घेत आहेत..लवकरच ही संख्या 300 वर पोहोचेल असा आत्मविश्वास अंकित ला आहे..अभ्यासिकेच्या खाली नाथे पब्लीकेशन चे सहकार्यांने उभे राहिलेले पुस्तकांचे दुकान आहे..हे सर्व कार्य अंकित त्यांचे दोन सह्कारी आणि मित्रांच्या मदतीने व्यवस्थित सांभाळत आहे..करोना काळ,लॉक डाऊन,यामधे सर्व तरुणाई हताश झाली असतांना अंकित तिखे चे हिमतीला खरेच दाद द्यावीशी वाटते..

■  उद्धव साबळे,

सरचिटणीस, रोजगार संघ, नागपुर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here