सोन्याचांदीचे दागिने चोरणारा चोर पोलिसांच्या तावडीत , महिन्याभरा पूर्वी केली होती घरफोडी

0
188

घुग्घूस :

संशयास्पद फिरत असलेला आरोपी रोहित बुद्धराज कश्यप (१९) रा. वार्ड क्र.३ घुग्घुस हा गुरवारला सकाळ दरम्यान घुग्घुस सराफा बाजार परिसरात त्याच्या जवळील चोरीचे सोन्याचांदीचे दागिने विकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सापळा रचुन त्याला अटक करण्यात आली. आरोपीची पोलिसांनी अंग झडती घेतली असता एकुण ३ लाख ६२ हजार ५२० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आढळुन आले.सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीची कसुन चौकशी केली असता एक महिण्यापुर्वी घुग्घुस येथील इंडेन गँस एजन्सी जवळील एका घराची घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. दिनांक १५/०९/२०२० ला घुग्घुस पोलीस ठाण्यात कलम ४५४, ४५७,३८० गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीची इतर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता ७ ते ८ महिण्यापुर्वी एका घरा समोरुन बजाज पल्सर काळ्या रंगाची ही दुचाकी स्वत:च्या घरी लपवून ठेवल्याची कबुली देताच ही दुचाकी किंमत ५०,००० रुपये सुध्दा जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाही चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सह.पो.नि.जितेंद्र बोबडे, प्रशांत नागोसे, गोपाल अतकुलवार, शेखर आसुटकर, संजय अतकुलवार, धनराज करकाडे, रविंद्र पंधरे, अमोल धंदरे व महात्मे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here