प्रहारच्या “त्या” स्वयंघोषित जिल्हाध्येक्षाची पक्षाने केली हकालपट्टी !

0
351

चंद्रपूर –

प्रहारचा मीच जिल्हाध्येक्ष भासवत अनेक दिवसांपासून जनतेची दिशाभूल करीत मोठमोठ्या कंपनी व अधिकाऱ्यास वेढीस आणीत असल्याच्या  तक्रारी वरून सुरज ठाकरे यांची हक्कलपट्टी करण्यात आली आहे प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजेच प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष, या पक्षाला संघटनेतून पक्षापर्यंत नेण्याचं काम आमदार बच्चू कडु यांनी केलं आहे.
आजही बच्चू कडू हा प्रामाणिक प्रयत्न करीतच आहे.
मागील 1 ते 3 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पदाधिकारी नसल्याने प्रहार सेवक नागरिकांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करीत आहे.
परंतु काही नवीन कार्यकर्ते म्हणून पक्षात सामील होऊन स्वतःला मीच जिल्हाध्यक्ष आहो असा गवगवा करीत होते मात्र आमदार कडू यांच्या आदेशाने तो गवगवा कायमचा बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मनसे मधून प्रहार मध्ये आलेले सूरज ठाकरे यांचा वर्षभराचा कार्यकाळ पण टिकला नाही व संस्थापक अध्यक्ष आमदार कडू यांच्या आदेशाने त्यांना पक्षमुक्त करण्यात आले आहे.
जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश देशमुख यांच्या आदेशाने याबद्दल प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून सूरज ठाकरे यांचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबंध नाही व ते आता प्रहार सेवक पण नाही.
प्रहार मधील प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमी पाठीशी उभा राहणारा हा पक्ष आहे परंतु अतिउत्साही कार्यकर्त्यावर जोरदार प्रहार सुद्धा यामध्ये होतो असे उदाहरण संस्थापक अध्यक्ष कडू यांनी दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here