चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेची स्थापणा

0
257

 

चंद्रपूर।

महाऔष्णीक विद्यूत केंद्र येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेची स्थापणा करण्यात आली असून आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने या संघटणेच्या फलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेड विज कामागर संघटना सिएटिपीएस, चे अध्यक्ष हेरमन जोसेफ, उपाध्यक्ष रोहित ब्रम्हपूरीकर, नितीन कार्लेकर, सुरेंद्र थुल, कार्याध्यक्ष प्रकाश पडाल, संपर्क प्रमुख विश्वजीत शाह, सचिव छोटेलाल रहांगडाले, यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक, कलाकार मल्लारप, युवा नेते पंकज गुप्ता, राशिद हुसेन, अॅड. राम मेंढे, विलास वनकर, विलास सोमलवार, विद्यार्थी प्रमुख अजय दुर्गे, राहूल मोहुर्ले, आदिंची उपस्थिती होती.
सामाजीक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करत कमी वेळात प्रसिद्धीस आलेल्या आ. जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड या संस्थेने कामगारांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी कामगार क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. धारिवाल कंपणीत विज कामगार संघटनेच्या स्थापनेनंतर त्यांनी आता आपला मोर्चा सिएसटिपीएस कंपणीकडे वळवला असून काल दस-याच्या शुभमुर्तावर येथे यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेची स्थापणा करण्यात आली आहे. आ. किशोर जोरगेवार यांनी सदर संघटनेच्या फलकाचे अनावरण केले असून हि संघटना येथील कामगारांच्या हक्कासांठी संघर्ष करेल अशी ग्वाही दिली आहे. यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा ३० टक्के विजेची निर्मीती येथे होते. या विज निर्मीतीत येथील कामगारांचे श्रेय मोठे आहे. घाम गाढून येथील कामगार महाराष्ट्र झगमक करण्याचे काम करत आहे. असे असले तरी येथील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. वेळोवेळी येथील प्रशासनाबरोबर आपण बैठका घेवून कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. येथील कामगारांना वेतनवाढीचा २० टक्के बोनस मिळवून देता आला हे याचेच फलीत आहे. पूढेही या संघटनेच्या माध्यमातून येथील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केल्या जाईल असेही यावेळी ते बोलले. यावेळी लाल फित कापून आ. जोरगेवार यांच्या हस्ते यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटना, सिएसटिपीएस, च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेचे सदस्य तुलेंद्र ढांडेकर, अक्षय मिस्त्री, किशोर धामनकर, विनोद धानोरकर, विलास डांगे, कैलास मोगरे, आनंद इंगळे, प्रकाश चलाख, विक्रम जोगी आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here