दीड वर्षांपासून DG लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रतीक्षेत

0
306

चंद्रपूर

पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत उपमुख्यमंत्री अजित ( दादा ) पवार यांना निवेदन दिले

DG लोन घेण्यासाठी दीड वर्षांपासून अर्ज दाखल केलेले आहे .परंतु त्यावर अजून पर्यंत काहीही निर्णय झालेला नाही म्हणून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना न्याय देऊन त्यांच्या आत्महत्या होण्यापासून त्यांना वाचवा आशा मागणीचे निवेदन या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून हे निवेदन मा.राज्यपाल भगतसिंग कोषारी व गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना दिले होते, त्यानंतर सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून तिसऱ्या वेळेस हे निवेदन उपमुख्यमंत्री अजित ( दादा ) पवार यांना देण्यात आले. यावेळेस जिल्हा संघटक सद्दाम अंसारी ,शहर संघटक साहील मडावी ,शहर उपाध्यक्ष देविदास बोबडे ,बशीरभाई अंसारी ,विधी सल्लागार आशिष नगराळे ,जिल्हा संपर्क प्रमुख अनिल वैघ ईत्यादी उपस्थित होते .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here