माणुसकीच्या भावनेने महीलेला दिलेली “लिफ्ट” पडली महागात ! महिलेचा झाला मृत्यू

0
431

ब्रम्हपुरी

अज्ञात इसमाच्या दुचाकीवर बसून जात असतांना दुचाकीवरून खाली पडल्याने महीलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मेंडकी-गायडोंगरी मार्गावर घडली.
यामध्ये मृत झालेल्या महीलेचे नाव बायजाबाई आत्राम (वय ७२) रा. गायडोंगरी असे आहे.
माणुसकीच्या भावनेने महीलेला दिलेली “लिफ्ट” पडल महागात पडली

 

कोरोना मुळे बंद असलेले आठवडी बाजार सुरू झाले . बाजारातुन काही  सामान खरेदी करण्यासाठी आपल्या गायडोंगरी येथील राहत्या घरुन सकाळी १० च्या सुमारास पायी निघाली होती. गायडोंगरी वरुन काही अंतरावर गेल्यानंतर वाटेत एक अज्ञात दुचाकीस्वार एकटाच दुचाकीने जात होता. तेव्हा त्या दुचाकीस्वाराला सदर वृद्ध महीला पायी जातांना दिसली. तेव्हा त्याने माणुसकीच्या भावनेने महीलेला दुचाकीवर बसवले. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर सदर महीला दुचाकीवरुन खाली पडुन मृत पावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here