गृहखात्याकडून दुर्लक्षित असलेले , 2014 पासून रिक्त असलेले RSI – RPI व R – DYSP यांचे प्रमोशन करा : पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे सरकारकडे तिसऱ्यांदा केली मागणी

0
227

 

चंद्रपूर

पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले

2014 पासून गृहखात्याकडून दुर्लक्षित झालेले RSI – RPI – व R – DYSP यांचे पदांचे प्रमोशन झालेले नाही त्यामुळे लवकरात लवकर या सर्वांचे प्रमोशन करावे ही मागणी करण्यात आली. या अगोदर एक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा  निवेदन देण्यात आले होते तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना सुद्धा निवेदन दिल्याचे गृहमंत्री यांना कळवण्यात आले आहे

यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , जिल्हा संघटक  सद्दाम अन्सारी , जिल्हा सचिव संजय खोब्रागडे, शहर संघटक साहिल मडावी, शहर उपाध्यक्ष देविदास बोबडे,  विधी सल्लागार  ऍड.आशिष नगराळे, राकेश कोकोडे , मंथना नंन्नावरे , आदी उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here