सिद्धबलीने कामगाराची पिळवणूक थांबवावी,

0
157

चंद्रपूर

     नुकताच झालेल्या सिद्धबली ताडाळी येथील एमआयडीसी कंपनी मध्ये अपघात होऊन एका कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीररीत्या जखमी झाले असून सदर कामगार हे अनेक वर्षांपासून या कंपनीमध्ये काम करीत आहे ही कंपनी अनेक वर्षापासून बंद होती आता नव्याने कंपनी सुरू झाली असल्याने अगोदर या कंपनीचे संपूर्ण मशनरी साहित्य बंद अवस्थेत असल्याने जीर्ण झालेले आहेत त्यामुळेच या कामगाराचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या परिवारातील व्यक्तींनी केले आहेत तेव्हा सदर कंपनीची चौकशी करून कामगारांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मृतक व अपघात ग्रस्त परिवाराकडून केली जात आहेत तेव्हा अन्यायग्रस्त व्यक्तींना तात्काळ न्याय देण्यात यावा तसेच इतरही कामगारांना शासनाच्या नियमानुसार त्यांना पगार देण्यात यावा कामगारांची पिळवणूक थांबवण्यात यावी अशा अनेक मागण्या सह किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना एका निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे तेव्हा सदर कंपनी यादी त्याच्या अनुषंगाने विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here