बापरेबाप : कांद्याच्या कट्यात दारूची तस्करी, 12,000 सिलबंद देशी दारूच्या शिशा केल्या पोलिसांनी जप्त

0
294

हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोगरे यांच्या डी.बी. पथकास माहीती मिळाली कि , हिंगणघाट कडुन चंद्रपुर कडे नंदोरी मार्गे दारूची वाहतुक होणार आहे , अशा मुखबीरचे खबरेवरून पंच व पो.स्टाफ सह यातील नमुद आरोपीतांवर प्रो – रेड केला असता , आरोपीतांचे ताब्यातील महेन्द्रा कपनीच्या बोलेरो पिकअप मालवाहक गाडी क . MH – 10 / CA – 6149 मधून 15 कांद्याचे कट्याचे वाहतुक करीत आहे असे भासवुन त्याखाली देशी दारूच्या 120 खरड्याचे खोक्यांमध्ये प्रत्येकी 90 एमएल . प्रमाणे 12,000 सिलबंद प्लास्टीक शिशा , 300 किलो कादे , बोलेरो गाडी व एक मोबाईल असा दारू व जप्त वाहनाची किं , 12,19,000 रू चा माल विनापास परवाना वाहतुक करताना मिळून आल्याने कारवाई करून आरोपी नामे 1 ) मंगेश मदन अहेरवाल , वय 23 वर्ष , रा . वय 23 वर्ष , रा . रवीदास नगर , वार्ड नं . 4 मुर्तीजापूर , जि . अकोला 2 ) बाबुलाल सिध्दार्थ सदानशिव , वय 30 वर्ष , रा . लंगापूर पोई , ता . मुर्तीजापूर , जि . अकोला विरूध्द पोस्टे ला दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री . प्रशांत होळकर , वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . भिमराव टेळे , , हिंगणघाट , पोलीस निरीक्षक श्री . सत्यविर बंडीवार , पोलीस स्टेशन , हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि . बी . पथकाचे पो.हवा . शेखर डोंगरे , नापोशि . निलेश तेलरांधे , सचिन घेवंदे . विशाल बंगाले , सचिन भारशंकर यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here