जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्य स्नेह भोजनाचे वितरण

0
168

 

घुग्घुस/ नकोडा :- इस्लाम धर्माचे प्रेषित जगाला प्रेमाची बंधुत्वाची शांततेची शिकवण देणारे हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांच्या जन्मदिनाचा सोहळा हा इस्लामी कॅलेंडर नुसार तिसऱ्या महिन्याच्या 12 रबीउल अव्वल रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
यालाच जश्ने ईद मिलाद ऊन नबी असे संबोधले जाते.

या दिवशी मोठया उत्साहात धार्मिक रैल्लीचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळे रैल्लीचे आयोजन करण्यात आले नाही.
हा महत्वपूर्ण उत्सव सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या पवित्र दिना निमित्य नकोडा येथील माजी उप – सरपंच हनिफ शेख, सलीम शेख, वाजीद शेख, यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना स्नेह भोजन व मिठाईचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर उपस्थित होते.
यावेळेस राजू तिराणकर, सादिक शेख, सरवर शेख, बन्सी साहू, शिवा गोनेवार, कोमु तिरुपती,बापू येमला आदीने अथक परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here