जातीचे प्रमाणपतत्रासाठी दोन महिन्यांपासून पायपीट; तहाशीलदारांचे कामात ढिसाळपणा

0
229

राजुरा (चंद्रपूर)

राजुरा तहसील येथे शेकडो नागरिक जातीचे प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले असून राजुरा तालुक्यातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून जातीचे प्रमाणपतत्रासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपासून जातीचे प्रमाणपत्रासाठी पायपीट करूनही जातीचे प्रमाणपत्र नागरिकांना मिळाले नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले असून नागरीक संताप व्यक्त करीत आहेत.
राजुरा तहसिल येथे नवीन तहसीलदार गाडे साहेब आल्यापासून कामात ढिसाळपणा आले असून अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिक बोलत आहेत.

तहसील च्या सेतु मधे जातीचे प्रमाणपत्राची विचारणा केली असता तहसीलदार यांना कोरोणा झाला आहे असे सांगून दोन महिन्यापासून सेतूचे कर्मचारी मार्फत नागरिकांना परत पाठविल्या जात आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड, व मनस्ताप सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here