सुरज बहुरिया हत्याकांडातील मुख्य आरोपी आकाश उर्फ़ चिन्ना अंदेवार अटक

462

बल्लारपुर (चंद्रपूर)

सूरज बहुरिया या युवकाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आला. या याप्रकरणात आतापर्यंत नऊ हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी घटनेनंतर पसार होता. मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आकाश उर्फ़ चिन्न आनंद अंदेवार रा. बल्लारपूर) असे अटकेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. जुने वैमनस्य, कोळसा आणि दारूतस्करीची किनार असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

बल्लारपुरातील आंबेडकर वॉर्डात सूरज चंदन बहुरिया हा राहत होता. सूरज आणि आरोपी आकाश उङ्र्क चिन्न आनंद अंदेवार हे दोघे मित्र होते. मात्र, कोळसा आणि दारूतस्करीतून या दोन मित्रांत वितुष्ट आले. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत होते. याच कारणातून आरोपी आकाशने सूरजला कायमचे संपविण्याचा कट रचला. या कटात आपल्या सहकारी मित्रांना सामावून घेत हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घटनेच्या दिवशी सूरज हा आपल्या मित्रांसोबत शहरातील अ‍ॅरेबिक हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर आरोपी अमन अंदेवार, अविनाश बोबडे व बादल हरणे हे तिघे मोटार सायकलने चकर मारून हॉटेलमध्ये असल्याची शहानिशा केली. या तिघांना बघितल्यानंतर सूरजला संशय आला. त्यामुळे सूरज हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. मात्र, मुख्य आरोपी आकाश उर्फ़ चिन्ना आनंद अंदेवार हा पसार होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदला बुधवारी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपीची संख्या आता दहा झाली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, संदीप मुळे यांच्या पथकाने केली