प्रशांत माहुरकर चा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात ,आरोपी भारतवर खुनाचा गुन्हा दाखल

0
272

चंद्रपूर – 5 नोव्हेंबरला रात्री 9 च्या सुमारास प्रियदर्शिनी चौक जवळील रेल्वे ट्रॅक वर एक इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता जखमी इसमाला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला.
रामनगर पोलिसांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली, कसून तपास केला असता रामनगर पोलिसांनी भारत मडावी या संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली त्याने आपणच त्या इसमाला मारहाण करून उडानपुलाखाली फेकले असल्याची कबुली दिली.
रात्रौ एका फोटो लॅब मध्ये काम करणारे प्रशांत माहुरकर हे वसुली करून परत दुकानाकडे जात होते मात्र प्रशांत वर दबा धरून बसलेला आरोपी भारत मडावी यांनी प्रशांत जवळ असलेली पैश्याची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला , यामध्ये भारतने प्रशांत ला बेदम मारहाण करीत पुलाखाली फेकले, खाली पडल्याने प्रशांत गंभीररीत्या जखमी झाला होता, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही, रामनगर पोलिसांनी आरोपी भारतवर खुनाचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here