बाल मजुरी, बाल विवाह तसेच शारीरिक व लैंगिक अत्याचार संबंधी जनजागृती

0
200

चंद्रपूर : बाल मजुरी, बाल विवाह तसेच शारीरिक व लैंगिक शोषणाच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी तसेच मुलांवर अत्याचार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी याबाबतची माहिती शासनाकडे पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षातर्फे नव्याने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाद्वारे मूल तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील प्रत्येक चौकात व दर्शनी भागात माहिती देणारी जनजागृतीपर व मार्गदर्शक फलके, स्टिकर्स लावण्यात आले आहे. त्यासोबतच आरवट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जिल्हा बालसंरक्षण कक्षाद्वारे बालविवाह व लैंगिक अपराध यापासून बालकांचे संरक्षण यासंदर्भात माहिती देणारी जनजागृतीपर फलके ग्रामपंचायत हद्दीतील दर्शनी भागात, चौकात तसेच अंगणवाडी केंद्रात लावण्यात आलेले आहे.

यावेळी जिल्हा बालसंरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी राजेश भिवदरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, सरपंच, क्षेत्र कर्मचारी हर्षा वराटे, तेजस्विनी सातपुते उपस्थित होते.

जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू असून आपल्या परिसरात लैंगिक अपराध व बालविवाह होत असल्यास त्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयास किंवा मदत कक्षास 1098 या दुरध्वनी क्रमांकावर द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे जिल्हा बालसंरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here