अवैद्य रेती वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदार यांनी मुख्य रस्त्यावर खोदला खड्डा.

0
236

सावली (चंद्रपूर)

तालुक्यातील साखरी घाटावरून अवैद्य रेती वाहतूक बंद करण्यासाठी सावलीचे तहसीलदार यांनी जेसीबीच्या साहाय्याने मुख्य रस्त्यावर खोदला खड्डा. याच मार्गावरील शेतकऱ्यांना शेती काम करीता जाणे येणे, बंडी नेण्याकरिता व इतर कामासाठी जाण्यास खूप अडचण येत आहे एक वर्षा पासून साखरी घाटावरून अवैध्य रेती वाहतूक होत आहे आज पर्यंत शासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि आता पंधरा दिवस अगोदर अवैध्य रेती वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला.शासनाने गौण खनिज लिलाव न केल्याने शासकीय व खाजगी बांधकाम करणे अडचण होत आहे म्हणून अवैध्यरित्या रेती उत्खनन करावे लागत आहे तरी शासन व लोकप्रतिनिधी यांनी गौण खनिज परवाना उपलबध करून द्यावे या मार्गावर लोंढोली, साखरी येथील मृत्यकांवर अंत्यसंस्कार करिता आणतात व हाच मार्ग विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान ला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो रोड वरती खड्डे खोदणे हे काम शासनाचे नाही.

महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कुठल्याही शासकीय किंवा खासगी कामाकरिता आवश्यक गौण खनिज मुरूम, रेती, गिट्टी असून खदान, व रेतिघाट परवाना न दिल्याने कामे खोळंबली आहे. तरी शासनाच्या निष्काळजी पणामुळे बंद असलेली कामे होणार काशी. शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या कामा करिता उपाय योजना करून द्यावी. एकीकडे शासनाला अंदाज पत्रकानुसार कालमर्यादेत कामे करतांना अटी शर्ती पालन करावे लागते.शासन विकास कामा करिता लागणारे गौण खनिज उपलब्ध करून देण्यासाठी कसलाही प्रयत्न करीत नसल्याने बांधकाम ठप्प पडले आहे कोणतेही बांधकाम म्हटले की मुरूम, रेती,गिटी हे गौण खनिज आवश्यक आहे हे उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे गेल्या कित्येक महिन्यापासून गौण खनिज उत्खनांवर पूर्ण पणे बंदी घातली आहे असे करीत असताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन न दिल्याने अवैध्य रित्या उत्खनन करून कामे पूर्ण करावी लागत आहे तरी शासनाने खड्डे खोदून अडवणूक करण्यापेक्षा परवाने देऊन सहकार्य करावे अशी मागणी लोक चर्चेतून होत आहे.

‘ साखरी घाटावरून मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या मार्गावर खड्डा मारण्यात आलेला आहे आणि शेतीचे हंगाम चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्यास त्यांना मार्ग काढून देण्यात येईल.सदर चौकशी महसुल मंडळ करीत आहेत.
-परीक्षित पाटील तहसीलदार सावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here