“पुढचं पाऊल” – अवघ्या काही सेकंदात कोरोना व्हायरसचा खात्मा

328

मुंबई:

कोरोना व्हायरसच्या(corona virus) वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात तसेच जगात विविध शोध(research) लावले जात आहे. कोरोनावरील लस(vaccine on corona) विकसित कऱण्यासोबतच याच्यावरील उपचारांच्या विविध पद्धतीवरही काम सुरू आहे. तर कोरोनापासून बचावासाठी आणि व्हायरसला नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे मास्क(mask) आणि स्प्रेही(spray) समोर येत आहे. यातच शास्त्रज्ञांनी लावलेल्या नव्या शोधानुसार अवघ्या काही सेकंदात कोरोना व्हायरसचा खात्मा होणार आहे. शास्त्रज्ञांनी एक थ्री-डी प्रिंटरपासून प्रेशर प्लाझमा जेट स्प्रे बनवला आहे ज्यामुळे अवघ्या ३० सेकंदात कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकतात मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या लॉस एंजेलिस स्थित युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये हा शोध लावण्यात आला आहे. शोधानुसार या प्लाझ्मा जेटने धातू, चामडे आणि प्लास्टिकवरील कोरोना व्हायरसचा अवघ्या ३० सेकंदात खात्मा होऊ शकतो. हा शोध कोरोनाविरोधातील लढाईमधील महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, प्लास्टिक, धातू, कार्डबोर्डआणि लेदर(बास्केटबॉल, फुटबॉल) यावर स्प्रे केल्यास त्याच्यावर असलेले कोरोना व्हायरसचे विषाणू तीन मिनिटांत नष्ट होती. यातील अधिकांश व्हायरस मरण्यासाठी केवळ ३० सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. याबाबत जर्नल ‘फिजिक्स ऑफ फ्लूड्स’ मध्ये या शोधाबाबत माहिती देण्यात आली आहे. स्थिर गॅसला गरम करून अथवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डशी संपर्क साधत हे बनवले जाऊ शकते.