गुन्हे शाखा पथकाने केला दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश, ०४ आरोपींसह ३ लक्ष ४१ हजाराचा मुददेमाल हस्तगत

0
182

 

चंद्रपूर : १५ नोव्हेंबरला

स्थानीक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन भद्रावती परिसरात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नामे आनंद विश्वकर्मा हा होंडा अक्टीवा गाडीने सुमठाना भद्रावती परिसरात संशयास्पदरित्या फिरत असुन त्याचे जवळ असलेली गाडी ही चोरीची आहे.

अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तो असलेल्या ठिकाणी पोहचुन सदर इसमास ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी
केली असता त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिली , त्याचे ताब्यातील गाडी होंडा अॅक्टीवा क्रं. एमएच ३४ बीएम ९६९४ ही त्याने त्याचे साथीदारासह पोलीस स्टेशन वरोरा हददीतुन सन २०१८ मध्ये चोरी केली होती.

यावरुन सदर आरोपी नामे आनंद विश्वकर्मा या ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आणि त्याचे साथीदाराने या गाडी व्यतीरीक्त चंद्रपुर आणि इतर जिल्हयातुन सुध्दा दुचाकी गाडया चोरी केल्या आहे. सदर आरोपी इसम आणि त्याचे इतर तिन साथीदार यांचे कडुन वणी येथील १) होंडा अॅक्टीवा, २) होंडा शाईन, पोस्टे यवतमाळ येथील ३) बजाज पल्सर, पोस्टे सोनगाव नागपुर येथील ४) बजाज डिस्कवर, पोस्टे रामनगर येथील ५) टिव्हीएस स्कुटीपेप, पोस्टे वरोरा येथील ६) होंडा अॅक्टीवा, आणि ०१ हिरो पॅशन प्रो, ०१ होंडा स्प्लेंडर, ०१ हिरो पॅशन प्रो प्लस असे एकुण ० ९ दुचाकी किं. ३,४१,००० रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर एकुण ४ आरोपी नामे १) गौरव गजानन चितांवार वय २१ रा . भद्रावती, २) अनिकेत प्रमोद लांडगे वय २३ रा . खांबाळा, ३) आनंद जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ रा . सुमठाणा भद्रावती, ४) राहुल लक्ष्मण राम वय २१ रा . सुमठाणा भद्रावती यांना पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलीस निरिक्षक खाडे यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सफौ, पंडीत वन्हाटे, पोना, मनोज रामटेके, पोना. गजानन नागरे, पोशि, विनोद जाधव, पोशि, सुरेंद्र महतो यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here