शेतकऱ्यांनी केली शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

488

शेतातील झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

कोलारी
ब्रम्हपुरी तालुक्यापासून 7 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी येथिल इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृतकाचे नाव सुरेश रामाजी बरडे (50) असे आहे.
सदर मृतक सकाळी 9 च्या सुमारास दिघोरी येथिल स्वतःच्या
शेतावर असलेल्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिघोरी येथिल गावकऱ्यांना आढळला त्यांनतर गावकऱ्यांनी सदर घटनेची माहीती कुटूंबियांना दिली.कुटूंबियांनी सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन यांना दिली.पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.सदर मृतकाला दोन मुले,पत्नी असा आप्त परीवार असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास ब्रम्हपूरी पोलिस करीत.