गेली एकविस दिवसापासुन शोध सुरू असुनही “मयुरी” बेपत्ता

277

चिमूर

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या खडसंगी वफर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३ मधील भुयारदेव, जोगामोगा जंगल परिसरात २७ आक्टोबंरला वाघिणीचे तीन बछडे त्यांच्या आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला. दोन बछड्यांवर उपचार सुरू असून वनविभागा तर्फे आज तागायत वाघिणीचा शोध सुरूच आहे.मात्र गेली एकविस दिवसापासुन शोध सुरू असुनही मयुरीचा काही पत्ता लागलाच नाही. ज्यामूळे वनकर्मचाऱ्यांची झोप उडाली असुन दिवाळी नंतर शोध मोहिमेस गती येणार आहे.

मयुरी वाघिणीचे दोन बछडे चंद्रपूर येथे प्राथमिक उपचार केंद्रात पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली आहेत. तर दुसरीकडे आपल्या बछड्या पासून दूर भरकटलेल्या वाघिणीचा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जंगलात दिवस रात्र डोळ्यात तेल टाकून पायपीट करीत एकविस दिवसा पासुन खडसंगी बफर, तळोधी, निमढेला, खडसंगी प्रादेशिक तथा शेत शिवार असा अंदाजे हजार किलोमीटर जंगल परिसर पिंजून काढला आहे. मात्र मयुरी वाघीण अद्यापही त्यांना सापडली नाही, शोध मोहीमेने वनकर्मचारीही थकले आहेत.
बछड्यांपासून दूर असलेली वाघीण आक्रमक होते. अशा परिस्थितीत ती शिवारात किंवा गावात येऊ शकते मात्र तसे काहीही झालेले नाही. वाघिणीसोबत घातपात तर झाला नसेल, अशी चिंता वन्यजीवप्रेमी कडून वर्तवली जात आहे. मयुरी वाघीण बछडे असलेल्या परिसरात आली नाही किंव्हा कॅमेऱ्यात कैद झाली नाही.त्यामुळे वनविभागाच्या चितेंत वाढ झाली आहे.

दिवाळी असल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्यामूळे वनविभागाच्या सुत्राच्या माहीती नुसार दिवाळी नंतर शोध मोहीमेला गती येणार आहे.बफ्फर व प्रादेशिक चे कर्मचारी घेत आहेत शोध वाघिणीचा शोध घेण्यासाठी एसटीपीएफ चिमूर, मूल, प्रोटेक्शन टीम चंद्रपूर, व बफर झोन खडसंगीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या पाच चमू तयार करून भुयारदेव, जोगमोगा, तळोधी आदी जंगलात या टीमने हजार बाराशे किलोमीटर जंगल शेत शिवारात शोध घेतला. मात्र अद्यापही मयुरी वाघीण त्यांना कुठेही दिसून आली नाही.

त्यामुळे आता बफ्फर खडसंगी व प्रादेशिक चिमूर चे वन कर्मचारी गाव शिवारात शोध घेत आहेत विशेष म्हणजे, वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. मात्र या कॅमेयांमध्येही सदर वाघिणीच्या हालचाली दिसून आलेल्या नाहीत.

     जय’ ची पुनरावृत्ती होणार काय?

मागील पाच वर्षा अगोदर कराडला येतून गायब झालेला आशिया खंडातील मोठा समजला जाणारा जय वाघ अचानकपणे गायब झाला व अनेक महिने शोध घेतला तरी जय मिळाला नाही त्यामुळे जय सोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती तर मयुरी सोबत होणार नाही अशीही चर्चा आता वन्यजीव प्रेमी मध्ये सुरू झाली आहे.