जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बनावट Facebook ID वरून होत आहे पैश्याची मागणी

0
566

चंद्रपूर : कोरोना काळात उचापती व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली, कोरोना काळातील परिस्थिती मध्ये नागरिकांना वर्क टू होम चा पर्याय निवडला त्यामुळे अनेक नागरिक ऑनलाईन कामे करू लागले.

परंतु त्या ऑनलाईन चा अनेकांना चांगलाच फटका बसला आहे, ऑनलाईन पैश्यांची अफरातफर, वस्तू खरेदी मध्ये अनेकांना आर्थिक वाटोळं लावण्याच्या अनेक घटना घडल्या.
परंतु आता या गुन्हेगारी ने आधुनिक होत सोशल मीडियावरून हल्ला करण्याच काम सुरू केलं आहे.
एखाद्या नागरिकांची फेसबुक आयडी बनवून त्यांच्या ओळखीच्या मित्रांना पैश्यांची मागणी करणारा संदेश पाठवून लुटण्याचं काम सध्या जोमात सुरू आहे, फेसबुकवर अनेक नागरिकांच्या बनावट आयडी बनविल्या गेल्या आहे, इतकेच नव्हे तर या गुन्ह्यात चंद्रपूर पोलिसांची आयडी पण बनावट पद्धतीने बनवून नागरिकांना पैश्यांची मागणी केली आहे.
हा प्रकार स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकारांसमक्ष कथन केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्ह्यातील जनतेला या माध्यमातून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, ऑनलाईन च्या या दुनियेत केव्हाही काहीपण होऊ शकते, कुणी या प्रकारे आपल्याला पैश्याची मागणी करीत असेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून विचारपूस करावी अन्यथा आपण सुद्धा या मायाजाल मध्ये फसले जाणार.
असा प्रकार जिल्ह्यात नागरिकांसोबत घडला असेल तर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याचे काम करावे, व इतर नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here