बल्लारपुरात गुन्हेगारी थांबेना ,पुन्हा एक हत्या !

749

 

बल्लारपूर-

अक्षय भोयर(ता.प्र)

बल्लारपूर शहरातील चंद्रपूर मार्गा वरील स्लज गार्डन च्या समोर नाग मंदिर परिसरातील(पुराना धोबीघाट) एका झोपडीत सुनील सिमलवार वय – 27 वर्ष रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर यांचा मर्डर झाल्याची माहिती आहे. सुनील हा लूटमार, ट्रक चालकांना त्रास द्यायचा ,सुनील वर सुद्धा गुन्हे दाखल असून,
विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार काल सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास सदर घटना घडल्याची माहिती असून सदर कृत्य आपसी मतभेदांमुळे घडल्याची माहिती असून मृतकाच्या चेहऱ्यावर मार असल्याचे प्रत्यक्षदर्शीच्या आहे.

बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.