यंग चांदा ब्रिगेड महिलांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना – आ. किशोर जोरगेवार

0
174

    नारीशक्ती चा उल्लेख ग्रंथासह ईतिहासातही नमूद करण्यात आला आहे. असे असले तरी सर्व क्षेत्रात खरंच महिलांना  सन्मानजनक वागणूक दिल्या जाते का याचा विचार झाला पाहिजे. महिला अत्याचार कमी होताना दिसत नाही. अनेक महिला अन्याया विरोधात लढण्याऐवजी अन्याय सहन करतात. मात्र  हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. गरजू महिलांपर्यत पोहचून त्यांची मदत करण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून केल्या जात असून  महिलांच्या म्हणजेच माझ्या बहिणींच्या सन्मानासाठी लढणारी ही एक संघटना असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   भाऊबिज  निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, घुग्घूस ग्रामीण संघटीका नेत्रा इंगुलवार, दुर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्येश्री हांडे, कल्पना शिंदे, रुपा परसराम, कविता शुक्ला, वैशाली रामटेके, अल्का राखंुडे यांच्यासह महिलां पदाधिका-यांची उपस्थिती होती.

   यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना महिलांची भुमीका मोठी राहिली असून या संघटनेतील सामाजिक कार्यात संघटनेच्या महिलांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महिलांनी महिलांच्या हक्कासाठी सुरु करण्यात आलेली यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी उत्तम काम करत असून गरजू महिलांपर्यंत पोहचून त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून अतिवृष्टीमूळे घरांचे नुकसाण झाल्याने हतबल झालेल्या भगीनींपर्यत आपण मदत पोहचवू शकलो. पूढे ही महिला आघाडीच्या वतीने महिलांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी वेगाने काम केल्या जाईल अशी आशा ही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलून दाखवली. साधारणतः एक किव्हा दोन दिवस भाऊबिजचा कार्यक्रम चालतो. मात्र या बाबतीच मी सौभाग्यशाली असून आणखी पूढील काही दिवस यंग चांदा बिग्रेडच्या वतीने आयोजीत विविध भाऊबिज कार्यक्रमाच्या माध्यमातून बहिनी माझी ओवाळणी करणार आहे असे हि ते यावेळी बोलले. मृत्यूच्या दारातून भावाला खेचून आनण्याची ताकद बहिणींच्या प्रेमात व प्रार्थनेमध्ये असते.  माझ्यासाठी  भाऊबिज निमित्य हजारो बहिनी प्रार्थना करत असतील तर मग मला खाबरण्याची गरज काय असेही यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी सर्व प्रथम लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांच्या वतीने आ. जोरगेवार यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी  यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या माया पेंदाम, पौर्णिमा डोंगरे, संगीता विश्रोजवार, संगीता गायधने, यांच्यासह महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. आणखी काही दिवस  शहरातील विविध भागात हे कार्यक्रम चालणार असून  या कार्यक्रमात कोरोना संबधीत सर्व नियम पाळल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here