नाही चालणार आता मुंबईत “कराची”

0
229

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची या नावाला आक्षेप घेतला असून वांद्र्यातील कराची स्वीट्स या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली.

नितीन नांदगावकरांच्या या मागणीनंतर कराची स्वीट्सचं नाव पेपरने झाकण्यात आलं आहे. नितीन नांदगावकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरदेखील याबाबत माहिती दिली आहे. “कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल असे नाव मुंबईत चालणार नाहीत. पुढच्या 15 दिवसात कराची नावाच्या पाट्या बदला”, असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here