भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे कडून आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन ।।

0
263

 

घुग्घुस ;-

राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवळणूका या 01 डिसेंम्बर रोजी होऊ घातल्या असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात नागपूर विभागीय पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवळणूकीच्या आचारसंहिता लागू झालेली आहे.
त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारांवर प्रभाव होऊ नये सर्व राजकीय पक्षाचे फ्लेक्स होर्डिंग्ज उतरविण्यात आलेले आहे.
असे असतांना भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या 21 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रक्तदान करणाऱ्याना हेल्मेट व वॉटर कॅनचे आमिष दाखविण्यात आले आहेत हे आचारसंहिताचे स्पष्ट उल्लंघन आहे व संपूर्ण शहर भरात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे मोठं – मोठे बॅनर लावण्यात आले आहे.
यासोबतच गांधी चौक येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोना महामारी पासून बचावासाठी कुठल्याही प्रकारे सामाजिक अंतर तसेच मास्कचा वापर करण्यात आलेला नाही.
निवडणूक आयोगाकडे या प्रकाराची काँग्रेस पक्षाच्या वतीने रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते सैय्यद अनवर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here