ओबीसी समाजाने काढली बाईक रॅली, २६ नोव्हेंबरच्या विशाल मोर्च्या संदर्भात जनजागृती

0
195

चंद्रपूर : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात संविधानदिनी २६ नोव्हेंबरला ओबीसी समाजातर्फे विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने शहरात जनजागरण करण्यासाठी शनिवारी (ता. २१) दुपारी २ वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसर (दीक्षाभूमी) येथून रॅलीला सुरुवात झाली. अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ‍ॅड. दत्ता हजारे, अ‍ॅड. फरहाद बेग, सूर्यकांत खनके, बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. विजय बदखल, सतीश मालेकर, अ‍ॅड. प्रशांत सोनुले यांनी रॅलीला झेंडी दाखविली.
शहरातील जुना वरोरा नाका चौक, जनता कॉलेज, वडगाव रोड चौक, उड्डाणपूल, तुकूम, गुरुद्वारा रोड, बंगाली कॅम्प, बसस्थानक चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड मार्गे अंचलेश्वर गेट, भिवापूरमार्गे मार्गक्रमण करीत रॅली अंचलेश्वर गेट कस्तुरबा चौक, समाधी वार्डमार्गे, पठाणपुरा गेट, गांधी चौक, जटपुरा गेट, रामनगरमार्गे चांदा क्लब मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रा. विजय बदखल, अ‍ॅड. प्रशांत सोनुले यांनी मार्गदर्शन केले. तसेच मोर्चात जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. रॅलीच्या आयोजनासाठी प्रा. माधव गुरनुले, बंडू हजारे, सूर्यभान झाडे, कुणाल चहारे यांच्यासह कार्यकत्र्यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here