सुगंधित तंबाखूचा व्यापार करून पत्रकाराने भद्रावती शहरात केला “ब्लास्ट”

542

*अन्न व औषध प्रशासन विभागाने कोल्हे चा आवळल्या मुसक्या*
*सुगंधीत तंबाखु व खर्रा जप्त*
*उलटा चोर कोतवाल को डाटे*
भद्रावती दि,21 (तालुका प्रतिनिधी)
अन्न व औषध प्रशासन विभागाचा चंद्रपुर येथील अधिकार्यांनी भद्रावती येथील आयुध निर्माणीचा चेक पोस्ट समोरील अतुल कोल्हे यांचा खर्रा व सुगंधीत तंबाखुचा दुकानावर दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी टाकलेल्या धाडित सुगंधित तंबाखु व खर्याचा पुड्या जप्त करण्यात आल्या.
भद्रावती शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखु व खर्चाची विक्री होत असल्याचा तक्रारी चंद्रपुर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. भद्रावती शहर हे अवैध सुगंधित तंबाखु व खर्रा विक्री चे माहेर घर झाले होते. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संबंधित विभागावर टीकेची झोड उटली होती.
या बाबींची दखल घेवून दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी चंद्रपुर येथील अधिकारी भद्रावतीत दाखल झाले.व कोल्हे यांचा सुगंधित तंबाखु व खर्रा सेंटरची झडती घेतली असता तेथे खर्रा आणि सुगंधित तंबाखु आढळून आला. सदर माल अधिकार्यांनी जप्त करून पुढील कारवाई साठी चंद्रपुर येथे नेण्यात आला आहे. दरम्यान कोल्हे याने संबंधित अधिकार्यांना आपन पञकार असल्याचे बतावणी करून तुम्हाला पाहुन घेईल असा दम धाड टाकणार्या अधिकार्यांना दिल्या. कोल्हेने महाराष्ट्र पञकार संघाचा चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष असल्याचे फेसबूक आयडी वर टाकलेले आहे.परंतु कोल्हेचे जिल्हा अध्यक्ष पद त्याचाकडे नसल्याची चर्चा आहे. कोल्हे हा जनतेला पञकारीतेचा आव आनुन धमकावतो. अशा कोल्हे नामधारी व्यक्तीला संपादकाने पञकारीतेतुन काढून टाकयला पाहिजे अशी मागणी जनते कडून गेली जात आहे. अशा व्यक्तीला पञकारीतेतुन काढले नाही तर तो एक पञकारीतेला कलंक राहिल.
त्यामुळे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी भावना अधिकारी वर्गात निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा या धाडि मुळे भद्रावती शहरातील अवैध रित्या सुगंधित तंबाखु व खर्रा विकणार्यांचे दाबे दणाणले आहे.