जिवती तालुक्यातील पहाडावरील रस्ते केव्हा बनवनार ?

0
196

पाटण
आकाश कागणे प्रतिनिधी (चंद्रपूर वार्ता)

महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या जिवती तालुक्यातील पहाडावर रस्त्याची दैनि अवस्था आहे
दर पाच वर्षांनी सरकार बदलत आहे मात्र जिवती तालुक्यातील रस्ते जैसेतेच आहेत. सदर रस्ते मोठ्या आपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

पाटन -शेनगाव -जीवती या मार्गाची खूप खराब अवस्था झाली असून जीवती पर्यंत अनेक ठिकाणी मोठमोटे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील डांबर व मुरूम निघून खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग आपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. एखादा नवीन वाहणधारक चारचाकी किंव्हा मोटरसायकल चालवीत असताना वाहनाच्या चेंबरला आदळून वाहन पलटी होण्याची शक्यता आहे. रात्री- बेरात्री रस्त्यावरील खड्डे वाहणधरकाला लक्षात येत नाही. त्यामुळे वाहन पलटी होण्याची शक्यता असून मोठा आपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी या मार्गावरील रस्ते त्वरीत बनवण्यात यावे अशी मागणी परिसरतील गावतील प्रवासी व वाहन धरकानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here