संशयास्पद अवस्थेत मिळाला युवकाचा मृतदेह

0
499

बल्लारपूर -अक्षय भोयर (ता.प्र)
जंगलामध्ये इशांत परकोटवर वय 33 वर्ष, रा.गणपती वार्ड बल्लारपूर या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विसापूर फाट्याजवळ एका युवकाला सायंकाळी 5:00 वा च्या सुमारास दुर्गंधी चा वास येवू लागला जवळ जावून पाहताच त्याला बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आला.

याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले संबंधित व्यक्ती जवळ विषाची बॉटल व इलेक्ट्रिक बिल मिळाले त्यावरून सदर व्यक्ती बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे कळते या संबंधीचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here