बल्लारपूर शहरातील गुन्हेगारीत वाढ ,गुंडांच्या घरात जीवघेणे शस्त्र

352

 

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता,प्र)

मागील काही दिवसांपासून बल्लारपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेली असून दररोज गुन्हेगारिच्या घडामोडी घडत आहेत. बल्लारपूर शहरात गुंडगीरीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांच्या घरी तलवारी,बंदुका खंजर ,यासारखे जीवघेणे शस्त्र असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी होत आहे.
या दरम्यान पोलीस निरीक्षक उमेश पाटील येथे रुजू झाल्यापासून त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला असला तरी अपुऱ्या पोलीस संख्याबळामुळे त्यांना काम करण्यास अडचणी येत आहेत. बल्लारपूर शहरातील लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी बघता येथे पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या गुन्हेगारांच्या घरी धाळ सत्र मोहीम रावबून त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त करणे आवशक्य आहे.