बल्लारपुरात अवैध सावकारी निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळत आहे

0
577

बल्लापुर – अक्षय भोयर ( ता,प्र)

बल्लारपूर शहर हे औधोगिक शहर आहे, येथे मोल मजुरी व व्यवसायिक लोकांचे वास्तव आहे ,
परंतु देशात उधभवलेल्या मंदी मुळे लोकांच्या व्यवसायावर ह्याचा परिणाम दिसून येतोय .
ह्याच लोकांच्या परिस्तितीचा फायदा अवैध सावकार जोमाने घेत असल्याचे बल्लापुरात अनेक ठिकाणी आढळून आल्याने दिसत आहे. शहरात व्यवसाय करनाऱ्या लोकांना सावकाराच्या गुंडांचा त्रासाला समोर जावं लागत आहे. या सावकारांकडून प्रतिमाह 10 टक्के , 20 टक्के,25, तर कोणी 30, टक्के असे व्याज जनते कडून वसूल करत आहे . जर एखाद्या व्यक्तीने व्याज देण्यास उशीर केला तर सावकारांचे गुंड त्या व्यक्तीला मारहाण, धमकी , देतात. या सावकारिचा धंदा या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. की या अवैध सावकारांमुळे कित्येकांनी आत्महत्या करून या त्रासामुळे आपले सुखी जीवन संपवुन या विषयाला तुजा दिला आहे परंतु अश्या कित्तेक आत्महत्या होऊन सुद्धा या प्रकरणा कडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here