वढा येथील कार्तिक पौर्णिमेची जत्रा रद्द : दुकाने लावल्यास होणार कार्यवाही

200

कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये, आढळून आल्यास कायदर्शीर कार्यवाही

घुग्घुस : जवळच्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर आषाढी कार्तिक पौर्णिमे निमित्ये यात्रा भरते वढा या ठिकाणी विठ्ठल रुख्मिणीचे पुरातन मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगमावर असल्याने यात्रेसाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते यामुळे विदर्भातील व परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येत असतात म्हणून या स्थानाला छोटा पंढरपूर म्हूणन ओळखल्या जाते भाविक भक्त गंगा स्नान करून विठ्ठल रुख्मिणीचे देव दर्शन घेतात परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरीता जिल्हाधिकारी यांनी कलम, 144 जमावबंदी आदेशानुसार मौजा वढा येथील यात्रा महोत्सव रद्द करण्याचा आदेश दिला आहे कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.