नकोडा वर्धा नदी चिंचोली घाटावर रेती तस्करांचा हजाराे ब्रास रेती साठा ?

0
184

घुग्घुस –

नकोडा वर्धा नदी चिंचोली घाटावर रेती तस्करांनी हजाराे ब्रास रेती साठा साठवुन ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जवळ पास रेती तस्कर हजार ब्रास रेती चोरी करून त्या रेती ला साठवुन रोज मध्य रात्री हायवा गाडीनने अन्य जिल्ह्यात *35 ते 40 हजार* किमती चा दरात रेती विकल्या जात असुन रेती तस्कर रेती विकुन मालामाल हाेतांना दिसतात . पटवारी दिलीप पिल्लई, मंडल अधिकारी किशाेर नवले, मुख्यठीकानी उपस्थीत असूनही दुर्लक्ष करतांना दिसतात. रेती साठा साठवून हजारो ब्रास रेती माफियानी जमा करून नदीपात्रात ठेवली आहे, अधिका-यांचा संगनमताने च रेती चोरी सुरू आहे असे बाेलल्या जात आहे. त्या मुळे लाखो कोट्यावधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडत असल्यांने शासनाला आर्थिक नुकसानाला समाेर जावे लागत असुन, मात्र रेती तस्करांची मुजोरी दिवसेन दिवस वाढत आहे. त्या परिसरात फेरफटका मारल्यास पटवारी दिलीप पिल्लई, व मंडल अधिकारी, किशोर नवले, हे रेती तस्करांचा दुचाकी वाहन क्र, *MH34 BN – 3826* वाहनाने फिरत असतांना आढळले. त्यात हे अधिकारी कसलीही कारवाही न करता थातुर मातुर आम्हा काही तरी करताे म्हनुन दाखवण्या करिता पाेकलेंड मशिन द्वारे रेती तस्करांनी रेतीची चाेरी करू नये म्हनुन घुग्घुस पाेलिस स्टेशन च्या मुख्य मार्गावर २० फुट माेठ्या स्वरूपातील गड्डे करण्यात येत आहे. परंतु तस्करांना करिता किती ही उपाय याेजना केल्या असल्या तरी अधिकारी यांचाच आशिर्वादाने रेती तस्कराचे मनाेबल वाढत असुन राेज घाटा वरिल रेती माफिया रेती ची तस्करी करत असल्याचे शहरात दबक्या आवाजात चर्चेला उत आला आहे. असे असुन प्रशासन मात्र कुंभकर्णी निवांत पणे निजला दिसुन येताे. या सर्व बाबीची सखाेल चाेैकशी करून तात्काळ दाेषी अघिकारी व रेती तस्करांवर कारवाही व्हावी अशी जनतेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here