यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी नेते बाबूरावजी नारायणराव मडावी यांची जंयती साजरी

0
122
आदिवासी नेते बाबुरावजी नारायणराव मडावी यांची जयंती यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी नेते स्व. बाबूरावजी मडावी यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रंसगी आ. किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या महिला प्रमूख वैशाली मेश्राम, माला पेंदाम, बंडू पेंदाम, जोगी नैताम, मनीषा आळे, साईराम मडावी, नरेंद्र मडावी, पोर्णिमा तोडकर, मीना जमगाडे, सिंधू तोडकर, माधूरी पेंदोर, नंदनी मेश्राम आदिंची उपस्थिती होती.

आदिवासी समाजाचे नेते बाबूरावजी नारायनराव मडावी यांची जयंती  सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही त्यांच्या जयंती निमीत्य छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांची प्रामुख्यतेने उपस्थिती होती. या प्रंसगी बाबूरावजी मडावी यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी त्यांच्या थोर कार्यावर प्रकाश टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here