बोगस आदिवासींच्या विरोधात विधानसभेत तारांकित प्रश्न मांडणार : आमदार सुभाष धोटे

0
192

राजुरा : गेल्या सात दशकापासून बोगस आदिवासींनी आदिवासींच्या आरक्षित नोकऱ्या मिळवून शासनाची दिशाभुल करून आदिवासींचे हक्क हिरविल्याच्या घटना राज्यात घडत असल्याने याची दाखल घेऊन आफ्रोट संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील जवळपास १२५०० नोकऱ्या अवैद्य ठरविले असून सदर नोकरीवर खरे आदिवासींना घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने १२५०० बोगस आदिवासी बेकायदेशीर नोकरीवर अजूनही कायम आहेत. हा सविधनाचा अपमान व घात असून बेकायदेशीरपणे व अन्यायाने आदिवासींच्या आरक्षित नोकऱ्या बोगस आदिवासींनी मिळविले असताना शासन गप्प असल्याने आफ्रोट संघटनेचे व बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेतली.

व बोगस आदिवासींवर फौजदारी कार्यवाही करून रखडलेली आदिवासी बेरोजगारांची विशेष पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देत विधानसभेत हा प्रश्न तरांकित प्रश्न म्हणून मांडणार असल्याची ग्वाही शिष्ट मंडळाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here