श्री गुरुनानक देवजीचे लंगर समानतेचा संदेश देणारे : भाजप जिल्हाध्यक्ष (श) डॉ गुलवाडे

0
142
गुरूनानक देवजी शीख धर्मियांचे प्रथम गुरु होते. १४६९ ला कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाला त्यांचा जन्म हिंदू परिवारामध्ये झाला. त्यांनी जात-पात नष्ट करण्यासाठी ,लंगर ची सुरुवात केली. छोटे-मोठे, श्रीमंत-गरीब यामुळे एकाच पंक्तीत खाली बसून जेवायला लागले.जात-पात नष्ट करण्याची ही अनोखी परंपरा त्यांनीच सुरू केली.जी आजही प्रभावशाली आहे.श्री गुरुनानक देव यांचे लंगर समानतेचा संदेश देणारे आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले. ते श्री गुरूनानकदेव जयंती निमित्त आयोजित अंचलेश्वर गेट येथील “गुरुद्वारा सिंघ सभा “येथे शुभेच्छा कार्यक्रमात सोमवारला(३० नोव्हेंबर) बोलत होते.
यावेळी भाजपा महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, गुरुनानक सेवा समिती अध्यक्ष चारणजीतसिंग वधवा,कोषाध्यक्ष सुरेंद्रसिंग गिल, रणजितसिंग सलूजा,माजी अध्यक्ष गुरुनानक सेवा समिती चमकोर सिंग बतरा ,भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे, भाजप महानगर सचिव राकेश बोमनवार यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले,म्हणाले गुरू गुरुनानकदेव यांनी,सांसारिक अज्ञानता दूर करून आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यास लोकांना प्रेरित केले. ईश्वर सर्वव्यापी आहे,असा संदेश त्यांनी दिला,असे ते म्हणाले.या प्रसंगी उपस्थित शीख बांधवांना भारतीय जनता पार्टी  महानगर च्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here