अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र सुरु केल्याबद्दल अनेक आदिवासी संघटनाच्या वतीने आ. किशोर जोरगेवार यांचा सत्कार

149

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामूळे चंद्रपूरात अनूसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामूळे विविध आदिवासी संस्था संघटनांच्या  वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बिरसा क्रांती दल, अखिल भारतीय विकास परिषद, आणि अपरोड या सामाजिक संस्थांच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेत धन्यवादहि  व्यक्त केले. यावेळी वैशाली मेश्राम, माला पेंदाम, बंडू पेंदाम, जोगी नैताम, मनीषा आळे, साईराम मडावी, नरेंद्र मडावी, पोर्णिमा तोडकर, मीना जमगाडे, सिंधू तोडकर, माधूरी पेंदोर, नंदनी मेश्राम आदिंची उपस्थिती होती.

विषयाचा सातत्याने पाठपूरावा करुन तो विषय मार्गी लावण्याचे कौशल्य असलेल्या आ. किशोर जोरगेवार यांना पून्हा एकदा अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला विषय मार्गी लावण्यात यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात  वास्तव्यास असलेल्या अनूसुचित जमातीच्या नागरिकांची मोठी संख्या लक्षात घेता येथे अनुसूचित जमातींचे जात पडताळनी केंद्र सुरु करण्यात यावे अशी जूनी मागणी होती. मात्र त्या दिशेने फार प्रयत्न होतांना दिसत नव्हते. त्यामूळे आ. किशोर जोरगेवार यांनी हा विषय चांगलाच रेटुन धरला होता. या संबधीत त्यांच्या कडून आदिवासी मंत्री के. सी पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय  मुंडे यांच्यासह संबधित विभागाशी सातत्याने  पत्रव्यहार केल्या जात होता. अखेर त्यांच्या याच पाठपूराव्याची दखल आदिवासी विभागाच्या वतीने घेण्यात आली असून चंद्रपूरात अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र सुरु करण्यास राज्य शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. हे केंद्र मंजूर होताच अनुसुचित जमातीच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक आदिवासी संघटना, संस्थांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत हा निर्णय झाल्याबदल त्यांचे आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देत त्यांचा  सत्कार केला आहे. यावेळी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.