तथाकथित पञकार कोल्हे विरोधात शेवटि गुन्हा दाखल* *सुगंधित तंबाखु व खर्रा प्रकरण*

0
343

भद्रावती, (तालुका प्रतिनिधी)
पत्रकारितेच्या आडून अवैध सुगंधित तंबाखु व खर्रा विक्री करणारा अतुल कोल्हे याच्या विरोधात भद्रावती पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आहे.
भद्रावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुगंधित तंबाखु व खर्रा विक्री होत असल्याच्या तक्रारी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप यांनी दि.२० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयुध निर्माणीच्या चेक पोस्ट समोरील अतुल कोल्हे यांच्या पानठेल्यावर धाड टाकली असता सुगंधित तंबाखु व खर्राच्या पुड्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या.हा सर्व माल जप्त करुन पुढील कार्यवाहीसाठी चंद्रपूरला नेण्यात आला.तसेच पानठेला मालकाने सदर सुगंधित तंबाखु व खर्रा कुठून आणला हे उघड केलेले नाही.त्यामुळे पुरवठादार व उत्पादकापर्यंत तपास करणे शक्य नाही.मात्र याचा तपास होणे आवश्यक असल्याने प्रवीण उमप यांनी सदर गुन्ह्याची रितसर तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी अतुल कोल्हे विरुद्ध अप.क्र.०५७० भा.दं.वि.कलम १८८ आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here